मागणी नसताना पुणे- नाशिक औद्योगिक महामार्ग बनविण्याचा शासनाचा अट्टाहास?

1 min read

आणे दि.१३:- राज्य सरकारने कोणाचीही मागणी नसताना पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग बनविण्याचा घाट घातला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पर्यायी रस्ता असून नव्याने औद्योगिक महामार्ग अनावश्यक असून त्यात पिकाऊ, बागायत क्षेत्रातून जात असून या महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असून. शासनाने महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिलेले आहे परंतु येत्या आठ दिवसात महामार्ग कायमस्वरूपी रद्द केल्याचे शासनाने परिपत्रक काढावे. अन्यथा बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रालयावरती प्रचंड मोर्चा तसेच सर्व संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. असा इशारा महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुणे- नाशिक महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांचा विरोध हा शासन दरबारा पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त काठापूर बुद्रुक या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला औद्योगिक महामार्गात जमिन जाणारे बाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी माजी उपसरपंच विशाल करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे, नवनाथ करंडे, पंढरीनाथ करंडे,धनंजय करंडे,फकीर करंडे,शिवाजी करंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काठापूर बुद्रुक हे गाव पूर्णपणे 100% बागायती आहे. परंतु या गावच्या सातबारा उतारा वर हंगामी बागायती चा शेर आहे. त्याचप्रमाणे शासनाचा रेडी रेकनरचा दर हा अत्यल्प आहे. आणि त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत बागायती जमीन ही महामार्गासाठी जाऊ देणार नाही. असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 2013 च्या कायद्यानुसार बागायती जमीन कोणत्याही महामार्गासाठी घेऊ नये.अशा सूचना असतानाही शासनाने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून काठापूर बुद्रुक गावातील क्षेत्र या महामार्गासाठी घेतले आहे. त्यामुळे या रस्त्याला काठापूर बुद्रुक मधील बाधीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा मार्ग कुठूनही न्यावा परंतु काठापुर मधुन हा मार्ग नेऊ देणार नाही. शासनाने या महामार्ग अधिसूचना काढून रद्द करावा. अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हट्टाग्र आंदोलन करण्यात येणार आहे.

——–
चौकट
राजकीय नेते आणि कंत्राटदार यांची अभद्र युती मलईदार प्रकल्प जनतेवर लादून प्रचंड भ्रष्टाचाराची सोय करत आहे. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सदर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी 21 सप्टेंबर पासून काठापूर येथे या पट्ट्यातील बाधित शेतकऱ्यांचे उपोषण करण्यात येणार आहे.

कानू करंडे, बाधित शेतकरी
——–
हा प्रश्न 19/9/2024 पर्यंत निकाली काढावा; अन्यथा प्रांनांतीक उपोषण, रस्ता रोको, सर्व शासकीय कार्यालय आणि मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्यालय व घरापुढे धरणे उपोषण, कोणत्याही राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी व प्रसंगी मतदान बहिष्कार अश्या पद्धतीने आंदोलन तीव्र करणार. असल्याची माहिती निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील सरपंच किशोर घोडे, मा.उपसरपंच नजीरभाई चौगुले, प्रतिक जावळे, गणपत गाडगे (मा ग्रा.सदस्य), सुनील जावळे सर (सदस्य ग्रा. प.निमगाव सावा) दादामिया पटेल (अध्यक्ष मुस्लीम जमात) अशोक गाडगे,अमोल जावळे, रिजवान पटेल, अनिस पठाण,सागर बोऱ्हाडे, शुभाष जावळे,व इतर बाधित शेतकऱ्यांनी दिली.
—–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे