व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेला सुरुवात
1 min read
नगदवाडी दि.४:- व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा, परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी. कांदळी, यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका स्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 (वयोगट 14/ 17/19 मुले-मुली) आयोजित करण्यात आल्या असून बुधवार दि.४ रोजी भव्य खो-खो स्पर्धांचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते पार पडले.
बुधवार दि.4 सप्टेंबर व गुरुवार दि.5 सप्टेंबर 2024 अशा दोन दिवस स्पर्धा सुरू असणार आहेत.या उद्घाटनासाठी प्रसन्न अण्णा डोके (माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे) तसेच भास्कर गाडगे (संचालक विशाल जुन्नर पतपेढी व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर).
पांडुरंग बढे (सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी) तसेच गोविंद बढे (संचालक प्रेरणा -को.ऑप पतसंस्था मुंबई) हे मान्यवर उपस्थित होते. डी.बी. बांगर (संचालक विशाल जुन्नर पतसंस्था) तसेच रोकडे माजी विश्वस्त विशाल जुन्नर सेवा मंडळ याही मान्यवरांची उपस्थिती लाभली.
रेखा शैलेश गुंजाळ (पोलीस पाटील-नगदवाडी,कांदळी) याही उद्घाटनासाठी उपस्थित होत्या. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच विश्वस्त लक्ष्मण कोरडे,विश्वस्त विक्रांत काळे, सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रमुख उद्घाटक शरद सोनवणे, भास्कर गाडगे, लक्ष्मण कोरडे, यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हरिशचंद्र नरसुडे यांनीही मार्गदर्शन व शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्घाटनासाठी स्पर्धेचे रेफ्री (पंच), सर्व सहभागी शाळांचे शिक्षक, तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष-किशोर काकडे हेही उपस्थित होते.
स्पर्धांच्या उत्कृष्ट आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले.उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक शिक्षिका मनीषा हांडे व किरण मुळे यांनी केले. क्रिडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व पराग छिल्लारे यांनी स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच स्पर्धा नियोजनबध्द पार पाडण्यासाठी अमोल जाधव यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विशेष कष्ट घेऊन तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. या कामी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे ही विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तालुक्यातील सर्व सहभागी शाळा,शिक्षक व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धा उत्साहात पार पडल्या.