जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुड टच, बॅड टच याविषयी व्याख्यान

1 min read

बेल्हे दि.४:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक (ता.जुन्नर) शाळेत सखी सावित्री समिती च्या वैद्यकीय समुपदेशक डॉ.सीमा निचित व डॉ. पुजा आव्हाड यांचे विद्यार्थ्यांसाठी व महिला पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. होते या निमित्ताने मार्गदर्शन करताना शाळेतील सर्व मुलींना महिला माता पालकांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून गुड टच व बॅड टच, डोन्ट टच याविषयी छान मार्गदर्शन केले .यासोबत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सकस संतुलित आहार कसा घ्यावा, विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा याविषयी अधिक माहिती दिली.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या कमल घोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नारायण पवार, डॉ. कुंडलिक आव्हाड, शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सुप्रिया बांगर, सदस्या वैशाली मटाले , मनीषा बांगर, शितल गुंजाळ इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच महिला पालक बहुसंख्येने व्याख्यानासाठी उपस्थित राहिले याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी मान्यवरांचा सन्मान केला.शिक्षणा फाउंडेशनच्या मेंटोर स्वाती शेलार यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शाळेतील मुलांनी मारुती स्तोत्र व गणपती स्तोत्र उपस्थित मान्यवरांना ऐकविले सर्वांनी ते ऐकून समाधान व्यक्त केले. तसेच कार्यक्रमानंतर शाळेतील वर्गांना भेटी देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेतील उपशिक्षिका कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. उपशिक्षक संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर हरिदास घोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे