श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन
1 min read
बेल्हे दि.३:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दि.२९ ऑगस्ट ते दि. ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजीत अभंग यांनी दिली.क्रीडा विभाग प्रमुख सदानंद भवारी यांनी आपल्या मनोगतातून मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब गावडे या़ंच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पाचवी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो खो, १०० मीटर धावणे या मैदानी स्पर्धा तर चमचा लिंबू, संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर इत्यादि फनी गेम्स घेण्यात आल्या.
शालेय शिस्त विभाग प्रमुख सुनिल गटकळ तसेच क्रीडा शिक्षक चंद्रकांत हगवणे, नितीन मुळूक, तुषार नांगरे, विजय कोल्हे, अमोल गेंगजे, कैलास जाधव यांनी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले.