श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम

1 min read

निमगाव सावा दि.३:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील यश माळी अकरावी सायन्स या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील 48 किलो वजनी गटात तायक्वांदो कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना, जिल्हा परिषद क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे द्वारा संचलित तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज, ता.जुन्नर, जि. पुणे येथे संपन्न झाल्या.

कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट आणि कुलस्वामी माध्यमिक विद्यालय आयोजित या स्पर्धेमध्ये श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. त्याची लांडेवाडी ता.आंबेगाव, जि.पुणे येथे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यश माळी याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या विद्यार्थ्याला महाविद्यालयीन क्रीडाशिक्षक विजय काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

त्यांचेही महाविद्यालयाकडून आणि संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच इतरही विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे