समर्थच्या १० खेळाडूंची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड
1 min read
बेल्हे दि.२:- जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जुन्नर तालुकास्तरीय योगासना स्पर्धा समर्थ शैक्षणिक संकुल येथील क्रीडा संकुलात पार पडली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर.
गुरुकुलचे प्राचार्य प्रा.सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,तसेच सर्व विभागाचे प्राचार्य उपस्थित होते.
या स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील एकूण २१८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- १४ वर्षे वयोगट मुले:-कुणाल मातेरे,नयन कुरकुटे,साई दिघे,मनवीत कुऱ्हाडे,उत्कर्ष बेलकर.१४ वर्षे वयोगट मुली:-निदा शेख,निधी वाजगे,जान्हवी कापसे,जीविका वरपे,गौरी चौधरी. १७ वर्षे वयोगट मुले:- रोहन भोईर,चेतन साप्ता,निलेश कुलट,जय भोईर, विपुल घुटे १७ वर्षे वयोगट मुली:- तृप्ती ललका,अंकुशा जाधव,साक्षी आहेर,काव्या बांगर,आर्या खांडगे. १९ वर्षे वयोगट मुले:- वीरेंद्र जाधव,रुद्रा दांडेकर,मल्हार भुजबळ,विशाल वाळवी,श्लोक कोल्हे.
१९ वर्ष वयोगट मुली:- राधिका खोंड,आर्या भुजबळ, दिव्या कोऱ्हाळे,अनुश्री चाळक,मयुरी झावरे. रिदेमिक योगा :- समृद्धी शेळके,सोहम शिरोळे,स्वरा थोरात,प्रीतम आंधळे,राधिका खोंड,मल्हार भुजबळ.आर्टिस्ट योगा:-
निदा शेख,स्वराज चौधरी,आकांक्षा भालेराव,समर्थ वारुळे,आश्लेषा म्हेत्रे,श्लोक कोल्हे.
समर्थ संकुलातील १० खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक एचपी नरसुडे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.सुरेश काकडे,प्रा.किर्ती थोरात,प्रा.ज्ञानेश्वर जाधव,विनायक वऱ्हाडी,महेंद्र गुळवे,स्नेहल ढोले, दिपाली नवले,अक्षदा गुंजाळ तसेच जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.