ठाण्यात एटीएसकडून छापेमारी
1 min read
ठाणे, दि.३:- ठाणे जिल्ह्यात दहशतवादाशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काल छापे टाकले आहेत. या छापेमारीत सिमीचा माजी सदस्य साकिब नाचन याच्या निवासस्थानाची तपासणी करण्यात आली. २००२ आणि २००३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये साकिब नाचनला दोषी ठरवण्यात आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०२३ मध्ये इसिस विरुद्धच्या कारवाईदरम्यान नाचनला अटक केली होती.अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही काही व्यक्तींची ओळख पटवली आहे आणि त्यानुसार शोध सुरू आहे. तसेच तिथे (पडघामध्ये) काही चुकीचे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, २७ वर्षीय अभियंता रवींद्र वर्माला तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या पीआयओशी संपर्कात होता.