बहिणीला त्रास देतो म्हणून केला खून; आळेफाटा पोलिसांनी १२ तासांत आरोपी केला गजाआड
1 min readआळेफाटा दि.२४:- बहिणीला त्रास देणाऱ्या इसमाचा डोक्यात दगड घालून खुन करून उज्जैन, मध्यप्रदेश येथे पळून जाणाच्या तयारीत असलेल्या आरोपीस आळेफाटा पोलीसांनी केले १२ तासांत जेरबंद. या बाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, दि. १०/०८/२०२४ रोजी ०५/३० वा. चे मौजे आळे ता. जुन्नर जि.पुणे गावचे हद्दीत हॉटेल फाऊंटन च्या
पाठीमागे मोरदरा रोडलगत आतमध्ये एक पुरूष जातीचे अनोळखी प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनला अ.म.र.नं ३५/२०२४ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते.
त्याबाबत अनोळखी प्रेताची ओळख पटविण्यासाठी तसेच प्रेताची माहिती काढण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली. त्याअनुषंघाने सदरचे अनोळखी प्रेत हे इसम नामे कैलास महादु भंडलकर वय ३२ वर्षे रा. मोरदरा, वडगाव आनंद ता. जुन्नर जि.पुणे याचे असल्याचे मयताचे कपडयावरून तसेच चप्पल वरून ओळखून मयताची पत्नी नाजुका कैलास भंडलकर हिने सांगितले.
त्यानंतर सदर मयताचे पोस्ट मॉर्टेम मा. वैदयकीय अधिकारी साो. प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांनी केल्यानंतर सदर मयताच्या डोक्यामध्ये कोणत्यातरी टनक हत्याराने मारल्याने त्याच मृत्यु झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्याबाबत मयताची पत्नी हिने दिले तकारीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं २४४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंघाने वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता, गोपनिय बातमीदारामार्फत आम्हांला माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा गणेश दादाभाऊ मदने वय २४ वर्षे रा. रामवाडी, खापरवाडी ता. जुन्नर जि.पुणे याने केला असून तो उज्जैन मध्यप्रदेश येथे पळून जाणार आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने अत्यंत शिताफिने गणेश दादाभाऊ मदने वय २४ वर्षे रा. रामवाडी, खापरवाडी ता. जुन्नर जि.पुणे ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंघाने सखोल तपास केला असता, त्याने सांगितले की, कैलास महादु भंडलकर हा माझ्या बहीणीला त्रास देत होता तसेच त्याला समजावून सांगितले तरीपण तो ऐकत नव्हता यामुळे मी त्यास दि.३१/०७/२०२४ रोजी दुपारी ०३/१५ वा.
चे सुमारास हॉटेल फाऊंटन च्या पाठीमागे मोरदरा रोडलगत आतमध्ये जंगलामध्ये घेवून जावून त्याच्या माझे साथीदारांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली. त्यामुळे नमुद आरोपी गणेश दादाभाऊ मदने वय २४ वर्षे रा. रामवाडी, खापरवाडी ता.जुन्नर जि. पुणे यांस अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कस्टडी मध्ये आहे.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख साो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रमीण, मा. रमेश चोपडे साो. अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. रविंद्र चौधर साो. उपविभागीय पोलीस अधिकारी साो जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो. हवा पंकज पारखे, पो. हवा माळवदे, पो. हवा पंडीत थोरात,
पो.कॉ. अमित माळुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो. कॉ विष्णु दहिफळे, पो. कॉ शैलेश वाघमारे यांनी केली असून सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक बडगुजर हे करीत आहेत.