पुतण्याचा खून करणाऱ्या काकांना बेड्या; चार दिवसांची कोठडी
1 min readओतूर, दि.२२:- शेतजमिनीच्या वादातून पुतण्याला पळवून देऊन त्याचा खून करणार्या काकांच्या मुसक्या ओतूर (ता.जुन्नर) पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपींना पोलिसांनी चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
जमिनीच्या वादातून निखील संदीप घोलप (वय २० रा. जुन्नर) असे खून झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर अभिषेक प्रकाश घोलप (वय २३) व जितेंद्र पांडुरंग घोलप (वय ३१ दोघे रा. वाटखळ, ता. जुन्नर) असे कोठडी सुनावलेल्या काकांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २) फळोदे (ता आंबेगाव) गावाच्या हद्दीत घडली होती. मृत निखील गुरुवारी (दि. १) दुपारी वाटखेळ येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद ओतूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भारती भवारी, नदीम तडवी. महेश पठारे यांनी तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे शोध घेतल्यानंतर आरोपी काकांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.