आळेफाटा एस. टी. स्टँडवर चोरी करणारी सराईत टोळी सध्या वेशातील पोलीसांनी केली जेरबंद; अडीच लाख रुपयांचे दागिने जप्त

1 min read

आळेफाटा दि.२४:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत एस.टी. स्टॅण्डवर फिर्यादी नामे कुंदा भरत गवळी वय ४० वर्षे रा.डोबिंवली पुर्व जि.ठाणे व वर्षा संदिप काटे असे दोघी पुणे नाशिक एस.टी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांचे पर्समधून सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं ७३४/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक, होडगर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रक्षाबंधन सणाच्या दिवशी एस.टी. स्टॅण्ड परिसरात पर्स मधून सोने चोरी करणारी टोळी येणार आहे असल्याची माहिती मिळाली, त्याअनुषंघाने साध्या वेशात पोलीस पथक तयार एस.टी. स्टेंड परिसरात पोलीस पथकाची पेट्रोलिंग नेमली असता. नमुद बातमी प्रमाणे पोलीस पथकास दोन इसम हे संशयीत रित्या एस.टी. स्टॅण्ड परिसरात फिरत असल्याने नमुद पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) संदिप उर्फ सागर सुरेश कांबळे वय २९ वर्षे रा. वार्ड नंबर १ रामनगर. श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, २) सोमनाथ अनिल पिसे वय २६ वर्षे रा. म्हसोबा झोपडपट्टी, वार्ड नंबर २ श्रीरामनगर, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंघाने सखोल चौकशी केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.

नमुद आरोपींकडुन २,५०,०००/- रू किंमतीच्या ३८.५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ०२ लगड तसेच त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली १,५०,००० रू किंमतीची पांढऱ्या रंगाची इंडीगो कार क्रमांक MH 17 AE 2524 असा एकुण ४,००,०००/- (चार लाख रूपये) किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रमीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर. सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो. हवा पंकज पारखे, पो. हवा आमित पोळ, पो. कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ नविन अरगडे, पो. कॉ सखाराम झुंबड, पो. कॉ विष्णु दहिफळे, पो. कॉ शैलेश वाघमारे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे