कावळ पिंपरीत ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी नारायणगाव पोलिसांनी केली जेरबंद
1 min read
नारायणगाव दि.२५:- जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी शेतामध्ये शेतकाम करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांकडून दोन गुन्हे उघडकीस आणून २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
सूरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २४), प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे (वय १९), अनिकेत रमेश सरोदे (वय २०), अमोल एकनाथ पेटारे (वय २९ तिघे रा. बजरंगवाडी ता. शिरुर, जि. पुणे), अभिषेक सुभाष पिटेकर (रा. बुरुंजवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कावळ पिंपरी परिसरात फिर्यादी भामाबाई बाबाजी येवले (वय ६१, रा. पारगाव तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) या १० ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास शेतीकाम करत जनावरे चारत होत्या.
त्यावेळी मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून भामाबाई येवले यांच्या गळ्याला सुरा लावून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने त्यांच्या जवळील १ लाख ८९ हजारांचे विविध सोन्याचे दागिने जबरी चोरी करून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, रस्त्यावरील सुमारे १२० किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार तुषार पंदारे,
दीपक साबळे, जर्नाधन शेळके, संजु जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीन, सागर धुमाळ, नीलेश सुपेकर नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, जगदीश पाटील, पोलीस अंमलदार कोकणे, डोके यांनी केली.