पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले;जखमी रुग्णालयात दाखल
1 min read
पुणे दि.२४:- पुणे जिल्ह्यातील पौड इथं हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन सहकारी होते, हे चौघेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
या घटनेचं वृत्त कळताच आजुबाजुच्या गावातील नागरिकांनी तसंच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरमधील लोक सुखरूप असल्याची पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.घोटावडेच्या दिशेनं येणारं हेलिकॉप्टर घटनास्थळी घिरट्या घालताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसलं त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर जोरात आवाज झाला. या हेलिकॉप्टरमधून चार लोक प्रवास करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना या दुर्घटनेची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
त्याचबरोबर शेजारच्या गावातील लोकांनी देखील याची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर युद्धपातळीवर या ठिकाणी बचावकार्य सुरु केलं आहे. अपघातानंतर पायलटही जखमी झाले आहेत, ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचंही कळतं आहे. तसंच कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. कारण या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. हेलिकॉप्टरमधील प्रवाशी कोण? 1) आनंद कॅप्टन (जखमी) 2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर) 3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर) 4) एस पी राम (प्रकृती स्थिर).
कुठलं हेलिकॉप्टर?
कोसळलेलं हेलिकॉप्टर मुंबईच्या ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं आहे. AW 139 हे हेलिकॉप्टरचं नाव असून मुंबईतील जुहू इथून उड्डाण करत ते विजयवाड इथं लँड करण्यासाठी हैदराबादकडं निघालं होतं. यामध्ये पायलटसह तीन प्रवासी प्रवास करत होते.