नगर- कल्याण महामार्गावर ट्रॅव्हल्स व कारचा भीषण अपघात; दोन जागीच ठार
1 min read
ओतूर दि.४:- कल्याण – नगर महामार्गावर पिंपळगाव जोगा या ठिकाणी कल्याणच्या दिशेने येणारी ब्रिझा कार एम एच 43 CG 2913 नगरच्या
दिशेने येणारी बस MH 47 BL 4251 या दोन्ही गाड्यांच्या अपघातात नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा कळम या ठिकाणच्या रिया गायकर, कुसुम शिंगोटे दोन महिला जागीच ठार झाल्या.
ही घटना रविवार दि.४ रोजी सकाळी ७:३० ते ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ५ ते ६ प्रवाशी जखमी झाले असून जखमींचे उपचार आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सुरू आहेत.
कल्याण नगर महामार्ग वर अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. प्रवाशांनी यावरती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तसेच पावसाळ्यात घाट परिसरातून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या अपघाताचा ओतूर पोलीस स्थानकाचे एपीआय लहू थाटे पुढील तपास करत आहेत.