शरदचंद्र पवार अभियांत्रिकीमध्ये अँटी रॅगींग सप्ताहानिमीत्ताने विविध उपक्रम साजरे
1 min readओतूर दि.२२:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह निमित्ताने सोमवार दि. १२ ते रविवार दि. १८/८/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अॅडव्हॉकेट विश्वनाथ नलावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोनिका रोकडे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात यांनी केले. प्रास्ताविकतेमध्ये आमच्या महाविद्यालयात कॉलेज सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकही रॅगिंग प्रकार झाला नाही याचा आवर्जून उल्लेख केला. प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट विश्वनाथ नलावडे यांनी हे महाविद्यालय रॅगिंग फ्री असल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले . तसेच आपण भविष्यातही कॅन्सर रोगासारख्या भयंकर प्रमाणात फोफावलेल्या या रॅगिंग पासून दूर राहावे असे आवाहन केले.सर्व सीनियर विद्यार्थ्यांना रॅगिंग फ्री असल्याचे श्रेय दिले. तसेच रॅगिंग मध्ये विद्यार्थी सहभागी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी सर्वांना आवाहन केले. रॅगिंग करणे कसे चुकीचे आहे रॅगिंग केले असता कोणती शिक्षा होते. त्याचे काय परिणाम होतात हे व्याख्यानेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले.महाविद्यालयात रॅगिंग सप्ताह निमित्ताने पथनाट्य ,रॅगिंग विषयक व्याख्याने,पोस्टर प्रदर्शन, ओवरनेस रॅली तसेच रॅगिंग संबंधी चित्रफीत असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. सदर रॅगिंग जनजागृती सप्ताह आयोजनामध्ये डॉ. जी यु खरात, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ मोनिका रोकडे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुतेने सहभाग घेतला.