बदलापूर शाळेतील चिमुरडीवर अत्याचार निषेधार्थ जुन्नर शहरात कँडल मार्च
1 min read
जुन्नर दि.२२:- बदलापूर मधील चिमुरडीवर झालेला अत्याचार व पश्चिम बंगाल महिला डॉक्टर बलात्कार, हत्येच्या निषेधार्थ बुधवार दि.२२ रोजी सायंकाळी जुन्नर शहरात नागरिकांकडून कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्च मध्ये विघ्नह सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सहभागी होऊन. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. या दोन्ही घटना काळजाला छेद लावणाऱ्या असून याचा करावा तेवढा निषेध कमी आहे असे शेरकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, मा.उपनराध्यक्षा अल्का फुलपगार, दत्ता गवारी, अविनाश कर्डिले, शैलेश म्हस्के, प्रदीप होगे, विक्रम परदेशी, निलेश चव्हाण, विकास राऊत, पोलीस अधिकारी, युवक – युवती व नागरिक उपस्थित होते.