बदलापूर घटनेबाबत आमदार अतुल बेनके यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र
1 min read
जुन्नर दि.२२:- सुसंस्कृत अशा महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडली. बदलापूर शहरातील नामांकित शाळेत एका चिमुकल्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. महाराष्ट्रासारख्या राज्याला न शोभणारी. लाजिरवाणी आणि संतापजनक अशी हि घटना असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की या घटनेनंतर जनतेत सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे आणि या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या गुन्ह्यात जो कुणी गुन्हेगार आहे आणि त्याला मदत करणारे जे कुणी असतील या सर्वांना तुरुंगात टाकून कडक शिक्षा झाली पाहिजे अशी तीव्र भावना सामान्य जनतेमध्ये आहे.
मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याबाबत योग्य ती पावले उचलून याबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून शक्ती कायद्या अंतर्गत हि केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन २ ते ३ महिन्याच्या आत यातील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अशी मागणीही आमदार अतुल बेनके यांनी केली आहे तसेच याआधी देखील अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभाग आणि हात असलेल्या सर्व गुन्हेगारांना शोधून त्यांनाही शक्ती कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले आहे.