स्वातंत्र दिनानिमित्त रमेश खरमाळे यांनी दिले शुभम तारांगण मधील रहिवाशांना पर्यावरण संरक्षणाचे धडे
1 min read
आळेफाटा दि.१६:- १५ ऑगस्ट दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शुभम तारांगण सोसायटी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सदस्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांसाठी पर्यावरण जनजागृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पर्यावरण मित्र वन अधिकारी रमेश खरमाळे यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले.
या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सुनील घोडेकर, प्रदीप शिंगोटे, विकास लामखडे आणि महिला वर्ग यांची उपस्थिती लाभली. रमेश खरमाळे यांनी प्रथम सोसायटीमध्ये वृक्षारोपण केले. विविध झाडांची पाहणी केली. सोसायटीमध्ये असलेले जल शुद्धीकारण प्रकल्प, सांडपाणी शुद्धीकारण प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, PV सोलर, सोलर वॉटर हिटर, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरन व सोसायटीत असलेल्या इतर प्रकल्पांची पाहणी केली. तसेच व्यख्यानाच्या कार्यक्रमात सोसायटीमध्ये असलेली विविध झाडे कशी उपयोगी आहे.
विविध प्रकल्प कसे फायदेशीर आहे. या बद्दल माहिती सांगितली. पाण्याचे जलसंधारण कसे करायचे, रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती किती उपयोगी आहे याचे महत्व सांगितले. पशु, पक्षी व वृक्ष संवर्धनामुळे जीवन चक्र कसे चालते हे समजावून सांगितले व त्यांच्याकडेचे असलेले अनेक अनुभव सांगितले.
सोसायटीतील चिमुकल्यानी स्वतंत्रता दिनानिमित्त वक्तृत्त्व व नृत्य गुणांचे सादरीकरण देखील केले. कार्यक्रमाला सोसायटीतील राहिवासीयांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.