उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जुन्नर तालुक्यात;जनसन्मान यात्रा, लाडकी बहिण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचे आयोजन 

1 min read

जुन्नर दि.१७:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उद्या रविवार दि.१८ रोजी जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. निलायम मंगल कार्यालय, वारूळवाडी येथे हॉस्पिटॅलिटी आणि जुन्नर तालुका पर्यटन संदर्भात आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सकाळी १०.३० वा. नारायणगाव बस स्थानक येथे आगमन आणि सकाळी ११.०० वा. बेनके फार्म हाऊस, १४ नंबर येथे लाडकी बहिण योजना चर्चासत्र आणि रक्षाबंधन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे