गुंजाळवाडीत प्रथमच मुस्लिम बांधवांनी सुन्नी मज्जित वर फडकवला तिरंगा

1 min read

बेल्हे दि.१६:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) शाळेमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला. यंदा प्रथमच गावातील मुस्लिम बांधवांनी सुन्नी मज्जित वर तिरंगा फडकावून हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदा ध्वज फडकवला असून या पुढे नियमित परंपरा अशीच चालू ठेवली. जाणार असल्याची माहिती गावातील मुस्लिम बांधवांनी दिली. या वेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, मुस्लिम बांधव, उपस्थित होते.तसेच गावच्या सरपंच नयना रामदास गुंजाळ यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत येथे, उपसरपंच संगिता भागचंद बोरचटे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्र येथे तसेच शाळेतील ध्वजारोहण मेजर विजय यशवंत बोरचटे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांचे समवेत बबन मारुती गुंजाळ,किसन (आप्पा) बोरचटे, उद्धव सखाराम गुंजाळ, मेजर मारुती बोरचटे यांच्या हस्ते शालेय ध्वजपूजन संपन्न झाले.याप्रसंगी शाळेच्या देखण्या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आयोजन शिक्षकवृंद पाटीलबुवा खामकर व तुकाराम खोडदे यांनी केले.

यावेळी शालेय रंगकामासाठी वसंत मारुती गुंजाळ यांनी ११००० रु चा चेक शाळेस प्रदान केला. तसेच शांताराम बबन गुंजाळ यांच्या माध्यमातून ११००० रु.चा निधी रंगकामास प्राप्त झाला. तसेच कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थांनी २६०० रु. रंगकामास दिले. निलेश बाबुराव गुंजाळ यांनी ३००० रु.चे लेखन साहित्य शालेय विद्यार्थ्यांसाठी दिले. त्याचे वाटप दिनकर गुंजाळ यांच्या हस्ते झाले. ग्रामस्थांच्या ठेवपावती व्याज रकमेतून शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप झाले.तसेच अतुल भागोजी गुंजाळ यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी शालेय विद्यार्थ्यांना १५६०० रु किमतीचे स्पोर्ट ड्रेस भेट दिले. तसेच त्यांनीच आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेमध्ये स्वामी विवेकानंदाचे तैलचित्र रेखाटण्यासाठी २१००० रु.चे भरीव योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी लक्ष्मण कोंडीभाऊ बोरचटे, महेश वाघ,शब्बीर मुजावर, माहीनूर मुजावर,तसेच ग्रामपंचायत गुंजाळवाडी यांनी भरभरून मदत केली.याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष सतिश बोरचटे,उपाध्यक्ष मारुती बोरचटे मेजर,रामदास गुंजाळ,धोंडीराम बोरचटे, दिनकर औटी,सुभाष बोरचटे,राहूल बोरचटे,गोविंद गुंजाळ,संतोष गुंजाळ,भागचंद बोरचटे,रमेश गुंजाळ, अमोल बोरचटे, संजय बोरचटे,गोरक्ष गुंजाळ,भाऊ बोरचटे.दिपाली बोरचटे,शांताराम गुंजाळ,सुनिल बोरचटे, बाळू क्षिरसागर,हनिफ मुजावर,संदिप बोरचटे,हरिभाऊ गुंजाळ,मयूर गुंजाळ,तलाठी राजू बढे,मंडलअधिकारी गायकवाड ग्रामसेविका वर्षा लोंढे, ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, पालकवर्ग. शिक्षकवृंद अंगणवाडी ताई,ग्रा.पं कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी,समस्त ग्रामस्थ इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचे हात या कार्यात राबले गेले. शेवटी खाऊवाटपाने कार्यक्रमाची हसत खेळत सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे