शालेय विद्यार्थीनींसाठी महिलांचे आरोग्य व सॅनिटरी पॅड या विषयावर गौरी बेनके यांचे मार्गदर्शन

1 min read

जुन्नर दि.१४:- अंजनी उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून जागर ‘ती’ च्या आरोग्याचा या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थीनींसाठी महिलांचे आरोग्य आणि सॅनिटरी पॅड्सचा या विषयावर समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन अंजुमन हायस्कूल, जुन्नर आणि आण्णासाहेब आवटे हायस्कूल, जुन्नर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना महिलांचे आरोग्य आणि सॅनिटरी पॅड्सचा योग्य वापर या विषयावर डॉ. अनुष्का शिंदे आणि गौरी बेनके यांनी मार्गदर्शन केले आणि संवाद साधला. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप करण्यात आले.

मासिक पाळीची प्रक्रिया, मासिक पाळीच्या सबंधित समज-गैरसमज आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या योग्य वापराबाबत जनजागृती करणे याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी समवेत अंजुमन हायस्कूल आणि आण्णासाहेब आवटे हायस्कूल च्या सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे