अवघ्या पाच दिवसांत उखडले नांदूर रोड चौकातील रबरी स्पीड ब्रेकर

1 min read

आणे दि.१३:- दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमुळे कल्याण- नगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला त्यामुळे या महामार्ग वरील आणे व पेमदरा (ता.जुन्नर) गावांच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदूररोड चौकात भरधाव वाहनांमुळे आजपर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत. तसेच अनेक जखमी झाले आहेत. त्यावर वारंवार ग्रामस्थांनी मागणी करून रविवार दि.४ रोजी या जागी अखेर रबरी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले. परंतु हे स्पीड ब्रेकर अवघ्या पाच दिवसात उखडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ता प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यावर आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी हायवे प्रशासन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास गतिरोधक उखडत असल्याची बाब आणून दिली. निकृष्ट दर्जाचे रबडी स्पीड ब्रेकर टाकल्याने हे स्पीड ब्रेकर उघडत आहेत. यावर रस्ते प्रशासनाने हे स्पीड ब्रेकर अजून वाहतूक व जास्त रहदारी रस्त्यावरती असल्यामुळे उघडत असल्याचे सांगितले. ही तात्पुरती ग्रामस्थांची मलमपट्टी केली असून यावरती कायमस्वरूपी डांबरी स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते व पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांनी केली आहे. तर यावर पाऊस उघडल्यानंतर डांबरी स्प्रेड ब्रेकर टाकण्याचे आश्वासन कल्याण – नगर महामार्गाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड यांनी दिले आहे. तर पेमदरा ते आळेफाटा या दरम्यान पावसामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते व प्रवाशांनी केली आहे.प्प

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे