पोस्टाकडून राखीसाठी खास पाकीट
1 min read
बेल्हे दि.१२:- रक्षाबंधन अगदी काही दिवसांवरच आले असून, त्यासाठी बहिणींकडून आपल्या भावाला राखी पाठविण्याची धडपड सर्वत्र सुरू झाली आहे. बहिणीच्या या प्रेमाचा मान राखत पोस्टाकडून राखीसाठी खास पाकीट तयार केले आहे. एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणी ची राखी भावाला वेळेत मिळावी यासाठी, विशेष मोहीम राबविली जात आहे. यामुळे यंदा भावाला आपल्या लाडक्या बहिणीची राखी वेळेत मिळत आहे. या रक्षाबंधनाच्या पर्वावर पोस्ट विभागाने विशेष पाकीट तयार केले आहे.
त्यावर राखीचे आकर्षक चित्र आणि राखीचा शुभ संदेश लिहिला आहे. या पाकीटमध्ये २० ग्रॅम वजनापर्यंतची राखी बसणार आहे. पुणे विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये हे राखी पॉकेट उपलब्ध आहे.
कित्येकदा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाला बहिणीची राखी मिळते. मात्र, यंदा ही चूक होऊ नये यासाठी पोस्ट विभागाने लगेच राखीचे पाकीट पोहच करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती पोस्ट विभागाने दिली आहे.