अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे
1 min readसंगमनेर दि. १०:- शहरात विविध ठिकाणी घरगुती गॅसचा वापर हा व्यवसायिक कारणासाठी अर्थात चार चाकी वाहनांमध्ये भरण्यात येत आहे किंवा हॉटेल इत्यादींमध्ये घरगुती गॅस चा वापर करण्यात येत आहे व हा घरगुती गॅस अवैध मार्गाने बेकायदेशीर मार्गाने रिफिलिंग करण्यात येत आहे अशी गोपनीय माहिती मिळालेली होती.
त्यामुळे आज दि.१० सकाळी 9.00 वाजता संगमनेर शहरातील अशा विविध ठिकाणी एकूण चार टीम तयार करून रेड करणे कमी पाठवण्यात आल्या होत्या. पाठवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी तीन ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस रिफिलिंग करून व्यवसायिक वापरासाठी वापरत असल्याचे,
तसेच बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून वाहनांमध्ये हा गॅस भरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या बेकायदेशीर कृत्यासाठी वापरात असणारी सर्व साधने, गॅस सिलेंडर, रिफीलिंगसाठीची मशिनरी इत्यादी जप्त करण्यात आले व पोलीस स्टेशन या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरचा प्रकार हा बेकायदेशीर असून यामुळे स्फोट होण्यासारखे गंभीर दुर्घटना घडवून आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे जीवित धोक्यात येण्याची शक्यता असते. सर्व आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3,7 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तपास सुरू आहे.