वडगाव आनंद येथील तरुणाचा खून, अज्ञाता विरोधात आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल
1 min read
आळेफाटा दि.१२:- वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील कैलास महादू भंडलकर वय ३२ (राहणार मोरदरा, वडगाव आनंद, तालुका जुन्नर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना रविवार दि.११ रोजी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि.११ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल फाउंटन आळे (ता.जुन्नर) च्या मागे मोरदरा रोड लगत एका अनोखी पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता.
सबंधित मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली असून वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील कैलास महादू भंडलकर वय ३२ (राहणार मोरदरा, वडगाव आनंद, तालुका जुन्नर) यांचा खून झाला असल्याचं समोर आले आहे.
सदर मयत व्यक्तीच्या डोक्याला टनक हत्याराने मारल्याने डोक्याची कवटी फुटली आहे. याबाबत आळेफाटा पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद नाजुका कैलास भंडलकर वय 29 यांनी दिली आहे.
अद्याप खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.यासाठी पोलिसांनी पथके नेमली आहेत. आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर अधिक तपास करत आहेत.