सहा महिण्यापासुन पोलीसांना गुंगारा देणारा बलात्कारातील आरोपी पोलिसांनी साध्या वेशात जाऊन केला जेरबंद

1 min read

अकोला दि.१०:- पोलिस रेकॉर्ड वरील फरार आरोपी यांचा शोध घेवनु अटक करण्याचे सक्त आदेश पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड यांनी सर्व पोलीस स्टेशन ला दिले होते. दरम्यान अवधुतवाडी पोलीस स्टेशन अप क ३०३/२०२४ भादंवि कलम ३७६ वगैरे मधील आरोपी ईर्शाद यासीन शेख (मुळ राहणार राज्य बिहार. हल्ली मुक्काम मकवानी नगर यवतमाळ) हा गेल्या ०६ महीन्या पासुन गुन्हयात स्वत ची अटक वाचवण्याकरीता सतत स्थानीक पोलीसांना गुगारा देत होता. गेल्या सहा महीन्या पासुन अवधुतवाडी पोलीस स्टेशन येथील गुन्हेप्रकटीकरण पथक हे मागावर होते. मागील आठवडयात आरोपी हा वेशांतर करून (बोरगाव जि आकोला) येथे राहत असल्याबाबत माहीती गुन्हेप्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यावरून अगदी फिल्मी स्टाईल ने व वेशांतर करून आरोपी ला अवधुतवाडी पोलीस स्टेशन येथील गुन्हेप्रकटीकरण पथकाने वेशातर करून दोन दिवस पाळत ठेवुन आरोपीला शिताफीने बेड्या ठोकण्यात यश मिळवले. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड यांचे आदेशान्वये, अप्पर पोलीस अधिक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, ठाणेदार पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांचे मार्गदर्शनात अवधुतवाडी गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि रोहित चौधरी. सपोनि अमोल पुरी पोउपनि जगताप सफौ गजानन वाटमोडे, पोहेकॉ रवी खांदवे, पोहेकॉ विशाल भगत, पोहेका महेश मांगुळकर, पोहेकों प्रशांत गेडाम, पोहेकॉ बलराम शुक्ला, नापोका रूपेश ढोबळे, पोकों कमलेश भोयर, पोकों सागर चिरडे, पोकों रशीद शेख, पोकों प्रणय इटकर आदीनी बजावली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे