घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी ओतूरचे तीन तरुण अटकेत; येरवडा कारागृहात रवानगी
1 min read
ओतूर दि.९:- जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिस ठाणे हद्दीतील ओतूर गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा उद्देश बाळगणाऱ्या तिघांना ओतूर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृह येरवडा येथे केली. ओतूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सूरज भरत पवार (वय २६), दत्तात्रय जगन्नाथ जाधव (वय २७) आणि प्रदीप दिलीप काळे (वय ३६, तिघेही रा. ओतूर, ता. जुन्नर) हे तिघे दोन धारदार तलवारी हातात घेऊन समाजामध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाने, तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल.
अशा रीतीने फिरवत असल्याची गोपनीय माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांना मिळाली होती. त्यानंतर हे तिघे पुन्हा शुक्रवारी सायंकाळी दोन तलवारी जवळ बाळगून मिळून आले. त्यामुळे पोलिस अंमलदार ज्योतीराम तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून.
त्यांना अटक केल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहाक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. त्यांना जुन्नरच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात केली.