व्यापाऱ्याने विक्री साठी दिलेला ८ लाख रुपयांचा कांदा ट्रक मालक व ड्रायव्हरने परस्पर विकला; दोघां विरोधात गुन्हा दाखल
1 min read
शिरुर दि.८:- कांद्याचे दर वाढत चालल्याने कांट्रक मालक, ड्रायव्हरनेदा चोरीचे प्रमाण वाढले आहे. बेल्हे (ता. जुन्नर) येथील कांद्याच्या चाळीमधून सव्वा लाख रुपयांचा कांदा चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच शिरूर तालुक्यातही अशी मोठी घटना घडली आहे. शिरूर वरून कांदामाल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव, हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा ट्रक मालक, ड्रायव्हरने अपहार करून मच्छिंद्र रोडे यांची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, भांबर्डे ता. शिरूर येथील कांदा व्यापारी मच्छिंद्र लक्ष्मण रोडे (वय ४५ वर्षे ) व्यवसाय – बजरंग ट्रेडिंग कंपनी, कांदा मार्केट शिरूर यांनी ४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील कांदा मार्केट येथुन हरियाना गुड्स कॅरीयर्स सावरगाव. येवला जि. नाशिक येथील पवनकुमार शर्मा यांनी पाठविलेली ट्रक नं. HR. 73. 9756 व चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांना विश्वासाने भरलेल्या कांदयाच्या ४७६ पिशव्या २५४९५ कीलो ग्रॅम वजनाच्या ८ लाख २३हजार २२४ रूपयांचा माल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगा, व हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता.
तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा अपहार करून ट्रकचालकाने रोडे यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.याबाबत पवनकुमार शर्मा, चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरूध्द शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप हे करीत आहे.