जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार पदावर नियुक्ती
1 min read
जुन्नर दि.६:- जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार म्हणून बदली झाल्याने त्यांच्या जागा डॉ. शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नव नियुक्त तहसीलदार डॉ. सुनिल शेळके यांनी २०१३ साली महसूल प्रशासनात सेवेला सुरुवात केली होती. त्यांनी दौंड व हवेली येथे निवासी नायब तहसीलदार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पुनर्वसन शाखेत तहसीलदार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांना २०१८ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि प्रशासन यांच्याशी सुसंवाद साधून अनेक समस्या सोडवल्या.तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनिक कार्यक्षमता दाखवून अनेक केसेस निकाली काढल्या. सबनीस यांच्या बदलीमुळे जुन्नर तहसील कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.