जुन्नरमधील १० बिबटे जामनगरच्या निवारा केंद्रात रवाना:- उपवनसंरक्षक अमोल सातपुते
1 min read
जुन्नर दि.१:- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबट प्राणी गुजरातमधील जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती उपवनसंरक्षक जुन्नरचे अमोल सातपुते यांनी दिली.
जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय, प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील वनतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्लीयांनी मान्यता दिली होती.
स्थलांतरित करण्यात येत असलेले १० बिबटे दोन महाकाय वातानुकूलित रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तर एक रुग्णवाहिका अतिताडीच्या मदतीसाठी सोबत आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे तीन रुग्णवाहिका बुधवारी (दि. ३१) सकाळी पोहचल्या आहेत. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले असून माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे १५ अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने दिवसभरात १० बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात चढवण्यात आले.
जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते जुन्नर, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, माणिकडोह येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १० बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित योग्य दखल घेऊन सोडण्यात आले. बिबट्यांची पाठवणी करण्यात येत असलेल्या बिबट्यांसह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांचे गुजरातचे पथक रुग्णवाहिकेसोबत आहे.
हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय महाकाय रुग्णवाहिकांमध्ये असल्याने सर्व बिबट सुरक्षितपणे रुग्णवाहिकेमध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर प्रवास लांबचा असल्याने रुग्णवाहिकेमध्ये बिघाड झाल्यास अथवा अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅन दिमतीला देण्यात आली आहे. जुन्नर वन विभागाने येथील मानव-बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण आहे.