कै.धोंडीभाऊ शेठ पिंगट कायम स्मरणात राहावेत’ म्हणून यांच्या नावे व्यासपीठ उभारणार:- आमदार अतुल बेनके 

1 min read

Oplus_0

बेल्हे दि.३०:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कै. धोंडीभाऊ पिंगट यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. 30 रोजी नुकताच संपन्न झाला.

यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक मान्यवर दशक्रियेला उपस्थित होते. बेल्हे बाजार तळावरील पत्र्याच्या शेडला कै. धोंडीभाऊ पिंगट यांचे देऊन कै. धोंडीभाऊशेठ पिंगट सभागृह असे नवीन नामकरण केले जाईल.

तसेच बैलगाडा घाटाजवळ कै. धोंडीभाऊशेठ पिंगट यांचे नाव देऊन व्यासपीठ उभं करून त्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केला जाईल.अशी माहिती यावेळी आमदार अतुल बेनके यांनी श्रद्धांजली अर्पण करत उपस्थितांना दिली.

यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, आशाताई बुचके, आदिवासी वादळ देवराम लांडे,

एस आय आनंद भंडारी, गणपत फुलवडे, पोपटराव गावडे, शरद चौधरी, बेल्हे ग्रामस्थ तसेच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कल्याण- अहमदनगर महामार्गावर गुळूचंवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवार दि.१९ रोजी झालेल्या अपघातात धोंडीभाऊ पिंगट यांचे शनिवारी दि.२० रोजी सायंकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले होते.

त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धोंडीभाऊ पिंगट यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावाई, नातवंडे, दोन भाऊ असा मोठा परीवार आहे. धोंडीभाऊ पिंगट यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, संचालक, बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच, बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक या पदाची जबाबदारी संभाळली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे