सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सदस्यत्वाचा राजीनामा:- पांडुरंग डुकरे, ग्रामपंचायत सदस्य

1 min read

पारगाव दि.२५:- ग्रापंचायत पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) गावचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याची माहिती पांडुरंग डुकरे यांनी दिली.

सरपंच रेश्मा बोटकर व उपसरपंच रामचंद्र डुकरे यांचा मनमानी व कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असताना मी वेळोवेळी विरोध करून सुद्धा त्यांनी हुकूम शाही पद्धतीने कारभार करत राहिले.

असा आरोप पांडुरंग डुकरे यांनी केला आहे. त्या गोष्टी ला कंटाळून मी पांडुरंग दिनांक २७ जुन २०२४ रोजी राजीनामा सरपंच यांच्या कडे सपूर्त केला होता. सदर राजीनामा दि.८ जुलै रोजी राजीनामा मंजूर करण्यात आला. अशी माहिती पांडुरंग कुष्णा डुकरे यांनी दिली.

ग्रापंचायत पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे लोक नियुक्त सरपंच रेश्मा विकास बोटकर ह्या दि.५ जानेवारी २०२३ रोजी निवडून येवून पदभार स्वीकारला. उपसरपंच या पदावर रामचंद्र रंगनाथ डुकरे यांनी पदभार स्वीकारला. व त्या व्यतिरिक्त १० सदस्य कार्यकरणीत असून एकुण १२ सदस्य संख्या होती.

प्रतिक्रिया

“पांडुरंग डुकरे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी केलेले मनमानी कारभाराचे आरोप हे चुकीचे आहेत. त्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला आहे.”

रेश्मा बोटकर, सरपंच, ग्रामपंचायत पारगाव तर्फे आळे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे