केंद्र शासनाच्या विरोधात आळेफाटा येथे राष्ट्रवादी काँगेस च्या वतीने निषेध आंदोलन

1 min read

आळेफाटा दि.२५:- केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करून आकसाने मांडलेला असुन यामध्ये शेतक-यांचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नसल्याची टिका शरद पवार गटाचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस चे उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांनी आळेफाटा (ता.जुन्नर) या ठिकाणी केली‌.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने आळेफाटा (ता.जुन्नर) येथील चौकात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्र द्वेशी अर्थसंकल्प निषेध आंदोलन व अमित शहा यांनी माजी के़द्रिंय मंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. चुकीचे विधान केल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी शरद पवार गटाचे राज्याचे समन्वयक व जि.प. माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, महिलाध्यक्षा सुरेखा वेठेकर. माजी जि.प.सदस्य अंकुश आमले, अशोक सोनवणे, संजय गुंजाळ, सावळेराम पाडेकर, प्रशांत चोगुले, पंचायत समीतीचे माजी सदस्य शाम माळी, सुरेश चौगुले,सुंदर कु-हाडे आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.यावेळी चौगुले म्हणाले की महाराष्ट्र हे देशाला सर्वाधिक कर देणारे राज्य असून देखील महाराष्ट्राचा रोष आणि आकस मनात ठेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तसेच केवळ सरकार वाचविण्यासाठी महाराष्ट्रातून जमा केलेला कर आंध्रप्रदेश व बिहार ला वळविण्यात आला. मुंबई आणि महाराष्ट्राला विकासापासून वंचित करण्याचे आणि रोजगार धंद्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचे काम तसेच शेतकऱ्यांना उध्वस्त करायचे काम , दूध उत्पादक करणाऱ्या महिला आणि शेतकरी वर्गाचे लिटरमागे १० रुपयांनी नुकसान करत आहेत.शरद पवार गटाचे राज्य समन्वयक लेंडे म्हणाले की अमीत शहा यांनी शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्यावर केलेले विधान चुकीचे असुन शहा यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत. तसेच केंद्र सरकारने जो अर्थ संकल्प मांडला आहे. यामध्ये या सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या खते औजारे आणि इतर साहित्यावर लावलेला जीएसटी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची काम करत आहे. तालुकाध्यक्ष थोरात म्हणाले की केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात शेतक-यांसाठी कुठल्याही प्रकारची योजना आणली नसुन. शेतमालाला जेव्हा बाजारभाव वाढतो तेव्हा त्या मालाची निर्यात बंद केली जाते व बाहेरून शेतमाल आणुन बाजारभाव उतरवण्याचे काम हे सरकार करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे