जुन्नरच्या पूर्व भागातील नदी, नाले, बंधारे, पाझर तलाव कोरडेच ; शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

1 min read

आणे दि.२५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बंधारे,नदी, नाले, पाझर तलाव कोरडेच असून पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नाही. मंगळवार व बुधवार दि. २५ झालेल्या रिमझिम पावसामुळे तालुक्यातील पिकाला चांगला दिलासा मिळाला आहे. अद्यापही येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गुळंचवाडी येथील गणेश पाझर तलाव अध्यापही कोरडा असून पावसाचे अत्यल्प पाणी साचले आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला होता परंतु पूर्व भागात तालुक्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. परंतु भिज पाऊस चांगला झाल्याने विहिरींना, पाझर तलावांना पाझर फुटून पाणी वाढेल अशी अपेक्षा आहे. बेल्हे, आणे पठार, राजुरी, उंचखडक,बेल्हे, साकोरी, निमगाव सावा, तांबेवाडी, आळे, लवणवाडी, या भागाला जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे