राज्यातील १ कोटी ८१ हजार महिला भगिनींचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
1 min read
मुंबई दि.२५:- महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यातील महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या अर्जदारांनी अल्पावधीतच १ कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. बुधवार दि. २४ सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील १ कोटी ८१ हजार ३०८ महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी आणि गावागावात लाभार्थ्यांपर्यंत योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, कार्यकर्ते या सर्वांच्या मौल्यवान योगदान दिलं आहे. आपण आपले काम असेच जोमाने सुरू ठेवून अधिकाधिक महिला-भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.