‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ‘ सहा नवे बदल

1 min read

मुंबई दि.२६:- नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्यावतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. यासह आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं आहे. यावेळी, राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजावण्यात आले आहे. त्यानुसार, योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्ती मध्ये बदल करुन शिथिलता करण्यात आली आहे.मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.

2. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे.3. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. 4. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे.मात्र,तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. 5. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. 6. ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

दरम्यान, या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय बैठकीत झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे