गडचिरोलीत १२ नक्षलींचा खात्मा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडून कारवाईत सहभागी जवानांना ५१ लाखांचे विशेष बक्षीस

1 min read

नागपूर, दि.१८ – गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी पोलीस आणि कमांडोंनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक छत्तीसगढ सीमेलगत झडली. त्यामध्ये सुरक्षा दलांचे २ जवान जखमी झाले.महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेलगतच्या एका गावात सुरक्षा जवान आणि नक्षलवादी आमनेसामने आले. त्यांच्यात दुपारपासून चकमक सुरू झाली. ती जवळपास ६ तास सुरू होती.चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी १२ नक्षलींचे मृतदेह आढळले.ठार झालेल्या नक्षलींकडील एके-४७, इन्सास रायफल्स आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मारल्या गेलेल्या नक्षलींमध्ये लक्ष्मण अत्राम ऊर्फ विशाल अत्राम या म्होरक्याचाही समावेश आहे. मोठ्या संख्येने नक्षलींचा खात्मा हे सुरक्षा दलांचे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. त्या कामगिरीबद्दल राज्य सरकारने कमांडो आणि पोलीस पथकांना५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. चकमकीनंतर काही काळ सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. जखमी जवानांना उपचारासाठी नागपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.दरम्यान, आसाममध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. कछार जिल्ह्यातील त्या घटनेत ३ पोलीस जखमी झाले. त्या मोहिमेवेळी दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे