विजेची तार तुटून दोन जर्शी गायी ठार; १० ते १२ घरांतील मीटर जळाले

1 min read

आणे दि.२४:- आणे (ता.जुन्नर) येथील चिखल ओव्हाळ येथील विजेच्या पोल वरील तार तुटून दुर्घटना होऊन रंगनाथ दाते यांच्या दोन जर्शी गायी शॉक लागून मृत्यू झाल्या आहेत. बुधवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. विजेची तार तुटल्यामुळे लोखंडी गायींच्या गोठ्याळा करंट आला. करंट लागून गोठ्यात बांधलेल्या या दोन गाई जागीच मृत झाल्या. तसेच जवळपासचे १० ते १२ घरातील विजेचे मीटर जळाली.

तसेच फ्रिज टीव्ही चे ही नुकसान झाले आहे.सदर घटना सकाळी सुमारे अकरा वाजण्याची सुमारास घडली त्यानंतर विद्युत अधिकारी व कर्मचारी दीड वाजता त्या ठिकाणी पोहोचले. विद्युत कर्मचारी वेळेवर न आल्याने येथील ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. दीड वाजता वाजता विद्युत कर्मचारी यांनी पांचनामा करण्याचं काम सुरू केलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे