आळेफाटा पोलीसांकडून ड्रोन संदर्भात नागरिकांना अहवान व सुचना
1 min read
आळेफाटा दि.२४:- आळेफाटा पोलीसांकडून ड्रोन संदर्भात नागरिकांना खालील सुचना देण्यात आल्या आहेत.१) मागील काही दिवसांपासून आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच जुन्नर तालुक्यामध्ये अवैध बेकायदेशीर विनापरवाना ड्रोन उडवले जाऊन त्याचा वापर टेहळणी करणे.
चोरी करणे इत्यादी कामांसाठी केला जात आहे अशी अफवा लोकांकडून पसरवली जात आहे. तरी रात्रीचे वेळी सदर ड्रोन उडवल्यामुळे अद्याप पर्यंत कोणतीही चोरीची घटना घडली नसून अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
२) आळेफाटा पोलिसांकडून रात्रीचे वेळी विनापरवानगी व बेकायदेशीर उडणाऱ्या ड्रोन संदर्भात पोलीस पथके तयार केली असून विनापरवाना अवैधरित्या रात्रीचे वेळी ड्रोन उडताना आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक पाठवले जाईल.3)अवैद्य बेकायदेशीर व विनापरवानगी ड्रोन उडवताना कोणताही संशयित इसम नागरिकांना मिळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,मिळून आलेल्या इसमास कोणत्याही प्रकारे मारहाण करू नये, मॉब लिंचींग चा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी.
सदर इसमावर योग्य ती कायदेशीर व कडक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये.
4) विनापरवाना कोणीही ड्रोन उडवताना मिळून आल्यास किंवा सदर बाबत कोणालाही काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा सदर व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल याबाबत दक्षता घेतली जाईल.
5) आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व ड्रोन धारकांनी डी.जी.सी.ए ची परवानगी असले बाबतचे सर्टिफिकेट आळेफाटा पोलीस स्टेशन येथे तात्काळ जमा करावे तसेच विनापरवाना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ड्रोन उडवू नये अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
6) रात्रीचे वेळी उडणाऱ्या ड्रोन बाबत कुणीही खोटी माहिती देऊ नये तसेच व्हाट्सअप वरील माहितीचे आधारे तर्कवितर्क न करता खात्रीशीर माहिती घ्यावी तसेच सदर व्हाट्सअप वरील ड्रोन संदर्भातील माहिती खात्री न करता इतर ग्रुपला फॉरवर्ड करू नये जेणेकरून विनाकारण नागरिकांमध्ये भीती पसरणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
7) सर्व नागरिकांनी रडार हे एप्लीकेशन आपापले मोबाईल मध्ये डाउनलोड जेणेकरून आकाशात विमान आहे की ड्रोन याबाबत खात्री होईल. अशाप्रकारे आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व सुज्ञ व सुजाण नागरिकांनी रात्रीचे वेळी उडणाऱ्या ड्रोन संदर्भात काळजी घेऊन.
वरील सूचनांचे तंतोतंत पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून आपले सहकार्यानेच संबंधितांवर योग्य ती कडक व कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल.
रात्रीचे वेळी ड्रोन उडताना आढळून आल्यास खालील नंबर वर तात्काळ संपर्क साधावा. संपर्क नाव व मो.क्र- 1)आळेफाटा पोलीस स्टेशन -(02132) 263033