आळे-पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातील शिवतेज महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला १२५० महिलांची उपस्थिती
1 min readआळेफाटा दि.२२:- आळे (ता.जुन्नर) येथे आळे-पिंपळवंडी या जिल्हा परिषद गटातील शिवतेज महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २२६ स्वयंसहायता समूहातील १२५० सदस्य महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना प्रभागसंघ सुशासन व आर्थिक नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बँक प्रतिनिधी यांनी सामाजिक सुरक्षा योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, PMFME scheme, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमांमध्ये बँक ऑफ इंडिया बेल्हे शाखे अंतर्गत १० समूहांचे एकूण ५० लाखांचे कर्जवाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उषा अभंग यांनी सामाजिक समावेशन, संस्था बांधणी, क्षमता बांधणी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. काळे सर यांनी उपजीविका विषयासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभागसंघाअंतर्गत आज अखेर झालेले कामकाज, प्राप्त निधी, जमाखर्च अहवाल वाचन व मंजुरी घेण्यात आली, पुढील वर्षाचे आर्थिक नियोजनाची मांडणी प्रभागसंघाच्या लेखापाल यांनी केले. उपस्थित महिलांनी स्वअनुभव कथन देखील केले. प्रभाग समन्वयक सुनिता सुवर्णकार यांनी प्रभागातील सद्य परिस्थितीवर माहिती दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी या वार्षिक सभेला शुभेच्छा दिल्या व प्रभागसंघाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, माजी पंचायत समिती सदस्य जिवन शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, आनंद नागरगोजे समन्वयक जिल्हा उद्योग केंद्र, राज्य अभियान कक्षाचे समन्वयक राहुल जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष पुणे येथून सोनाली अवचट. महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सीईओ राहुल शेळके, डॉ. अर्चना तितर,डॉ. गांधी, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक सरडे सर व कोचरे सर, बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक स्वाती लायगुडे, प्रभाग समन्वयक सागर ठीकेकर.
प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामसंघांचे पदाधिकारी, लेखापाल, सीआरपी, व २२६ स्वयंसहायता समूहातील १२५० सदस्य महिला उपस्थित होत्या.