गुळुंचवाडी बायपास रस्ता करा, मृत व जखमी व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करा, जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार बेनके यांची मागणी
1 min readबेल्हे दि.२२:- गुळुंचवाडी (बेल्हे) येथील अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करा अशी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी (बेल्हे) येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समिती बैठकी दरम्यान भेट घेऊन या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. झालेली घटना हि दुर्दैवी आहे शासन स्तरावर लवकरच मदत व इतर आवश्यक बाबींची पुर्तता करण्याची मागणी आमदार बेनके यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.या घटनेबाबत तात्काळ चौकशी करून बायपास रस्ता करणे. बाबत तसेच मृत आणि जखमी व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त मदत करण्याबाबतची मागणी या वेळी आमदार बेनके यांनी केली आहे.सदर घटना घडल्यानंतर आमदार बेनके यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. आणि जखमी व्यक्तींची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस देखील केली. घटनेच्या ठिकाणी गतिरोधक तसेच इतर उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली आहे.