व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थांनी अनुभवला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क

1 min read

नगदवाडी दि.२२:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित ‘व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांनी घेतला- ‘ Election for Students Council’ म्हणजेच ‘ विद्यार्थी निवडणूक परिषद’ या प्रक्रियेचा नाविन्यपूर्ण अनुभव घेतला.

‘डेमोक्रसी’ म्हणजेच ‘लोकशाही’ ज्याचा अर्थ आहे- लोकांचे शासन-जिथे सत्ता प्रत्यक्षपणे किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत लोकांच्या हाती असते. ही संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. तसेच शासन व्यवस्थित चालवण्यासाठी निवडून आलेल्या उमेदवारांचे हक्क आणि कर्तव्य काय असतात. हे ही विद्यार्थ्यांना समजले. सत्तेचा दुरुपयोग न करणे व मानवी हक्काचा आदर करणे ही लोकशाही शासनाची भूमिका विद्यार्थ्यांना समजली. या प्रक्रियेत इ.8 वी व इ.9 वी चे विद्यार्थी या हाऊसेससाठी हेड गर्ल्स, हेड बॉय, हाऊस -व्हाइस कॅप्टन, या पदांसाठी उमेदवार म्हणून उभे होते. आपापल्या पदासाठी त्यांनी आपापली चिन्हे/ प्रतिके निश्चित केली होती.गृहीत केलेल्या वेळेत त्या उमेदवारांनी आपापला प्रचारही केला. मतदानाच्या दिवशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान विभागात जाऊन मतदान केले.यासाठी मतदान प्रणालीच उभी करण्यात आली होती.टेबल व्यवस्था,मतदान पेट्या, बोटांना लावलेली शाही, बॅलेट पेपर, मतदान यादी व चिन्हावर मारलेला शिक्का व बॅलेट पेपर – मतदान पेटीत टाकणे या संपूर्ण मतदान प्रणालीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यामुळे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भविष्यात मतदान प्रक्रिया कशी असेल व योग्य उमेदवार कसा निवडला जातो. याची माहिती मिळाली. निवडणूक प्रक्रिया नंतर मतमोजणी करून जे उमेदवार नियुक्त होतील त्या उमेदवारांना 26 जुलै कारगिल दिवस/ Investiture Ceremony या दिवशी पदक (मानचिन्ह) देऊन गौरविण्यात येईल.या निवडणूक प्रक्रियेसाठी स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी मार्गदर्शन केले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचे सहकार्य लाभले.
निवडणूक प्रणालीसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. ‘विद्यार्थी मतदान परिषद’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे