आळे गावच्या सरपंचपदी सविता भुजबळ यांची निवड
1 min read
आळेफाटा दि.२८:- आळे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्यास रपंचपदी सविता चंद्रकांत भुजबळ यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुळे यांनी दिली. सरपंच प्रीतम काळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवारी (दि.२७) निवडणूक झाली. सरपंच पदासाठी सविता चंद्रकांत भुजबळ, प्रीतम काळे, सखाराम भंडलकर, दिगंबर घोडेकर व सोनाली अनिल वाघोले यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये प्रीतम काळे, सखाराम भंडलकर यांनी माघार घेतली. तीन अर्ज राहिल्याने निवडणूक घेण्यात आली.
यामध्ये सविता भुजबळ यांना ११, दिगंबर घोडेकर यांना २ व सोनाली वाघोले यांना ३ मते मिळाली. यामुळे सविता भुजबळ यांना विजयी घोषित करण्यात आले. तलाठी राजेंद्र मुंगळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे यांनी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
या वेळी उपसरपंच मंगेश कु-हाडे, विजय कु-हाडे,अर्चना गुंजाळ, सुधीर लाड, ज्योती शिंदे, मंगला तितर, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, जयश्री डावखर, रज्जाउद्दीन मोमीन, लता वाव्हळ, उर्मिला कु-हाडे उपस्थित होते.