बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सर्वाधिक मताधिक्य 

1 min read

बेल्हे दि.१७:- जुन्नर तालुक्यामधील बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ८ हजार ७९७ मताचे मताधिक्य हे जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक

बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातून मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक राजुरी गावातून १३६६, बेल्हे १०३०, निमगाव सावा १०२९, पारगाव तर्फे आळे गावातून ८२४, साकोरी ७३१,

मंगरूळ ६६६, झापवाडी ५०९, गुंजाळवाडी ३८४, शिंदेवाडी ३६२, रानमळा २९७, कावळपिंपरी २८२, बांगरवाडी २३६, सुलतानपूर २३४, जाधववाडी २१८, आणे १८४, नळावणे १८१, तांबेवाडी १०१, पेमदारा ७५, उंचखडक ६४, आनंदवाडी २४ असे मताधिक्य मिळाले.

तर त्या खालोखाल पिंपळगाव – जोगा डिंगोरे जिल्हा परिषद गटातून ७१९० मताधिक्य मिळाले तर ओतूर- पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातून ४८६३ मताचे मताधिक्य मिळाले, नारायणगाव – वारुळवाडी जिल्हा परिषद गटातून ४४१४ मताधिक्य मिळाले. अशी माहिती खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे