जुन्नरचा आमदार शिवसेनेचाच होईल:- भास्कर गाडगे

1 min read

खोडद दि.१३:- जुन्नर तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचाच होईल असा विश्वास शिवसहकार सेनेचे तालुका संघटक भास्कर गाडगे यांनी खोडद (ता.जुन्नर) येथे झालेल्या शिवसेना आढावा बैठकीत केला. तसेच जुन्नर विधानसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळणार असून, आता जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचाच होईल. त्यामुळे जोमाने कामाला लागा,” अशा सूचना भास्कर गाडगे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.बोरी कांदळी जिल्हा परिषद गटातील कार्यकत्यांची खोडद येथे आढावा बैठक झाली. त्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनंदन करून तालुक्यातील शिवसैनिकांचे आभार मानले. त्यावेळी तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांनी विधानसभा लढवावी, अशी मागणी कार्यकत्यांनी केली. या वेळी संतोष मोरे, सुनील पवार, महेश बडे, विशाल रेपाळे, विजय गायकवाड, किरण डावखर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी भास्कर गाडगे बोलताना म्हणाले, “जुन्नर तालुक्यात दोन वेळा शिवसेनेचे आमदार राहिले आहे. जुन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या तालुक्यात शिवसेनेचेमतदानही अधिक आहे. माउली खंडागळे हे शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. शिवसेना हीच त्यांची ओळख आहे. जुन्नरची जागा शिवसेनेला दिली जाईल, जुत्ररचा आमदार शिवसेनेचा होण्यासाठी जिवाचे रान करू.”

यावेळी सुनील पवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावासाठी, शेती पंपांच्या वीज बिलांसाठी, दूध दरवाढीसाठी, कोल्हेसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. निवडणुकीत केलेले काम पाहून मी विधानसभा लढवावी, अशी इच्छा तालुक्यातून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समन्वयातून जो मार्ग निघेल, त्यानुसार पुढे निर्णय घेतला जाईल. माउली खंडागळे, तालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कांद्याच्या बाजार भावासाठी आणि मराठा आरक्षणासाठी माउली खंडाळे यांनी सातत्याने आंदोलन केली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचा जनसंपर्क आहे. सक्षम पर्याय म्हणून त्यांच्या नावाला लोकप्रियता आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे