जुन्नर तालुक्यातील ११ रस्त्यांसाठी ६९ कोटी ४८ लक्ष रुपये निधी मंजूर:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.२०:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ११ रस्त्यांची ४१ किलोमीटर दर्जोन्नती करण्यासाठी ६९ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

या मध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे. १) प्रजिमा ४८ खोडद ते किल्ले नारायणगड गडाचीवाडी रस्ता करणे – ३.५६० कि.मी रक्कम – ५ कोटी १३ लक्ष ६८ हजार रुपये २) राजुरी ते दावल मलिक रस्ता करणे – ३.०८० कि.मी रक्कम – ५ कोटी २३ लक्ष ६७ हजार रुपये
३) प्रजिमा १२९ वडगाव सहाणी ते भोरमळा शिंदेमळा रस्ता करणे. – ३.०८० कि.मी रक्कम – ५ कोटी ३८ लक्ष ७७ हजार रुपये ४) रामा ६१ ते गायवाट मुक्ताई मंदिर रस्ता करणे – ४.७०० कि.मी रक्कम – ७ कोटी ९३ लक्ष ९७ हजार रुपये ५) प्रतिमा ९ पारगाव तर्फे आळे ते नेहरकर मळा रस्ता करणे – ४.५३० कि.मी रक्कम – ८ कोटी २८ लक्ष ६५ हजार रुपये. ६) प्रजिमा ८ ते जाधववाडी ते निमगाव सावा रस्ता करणे – ४.२५० कि.मी रक्कम – ७ कोटी ६३ लक्ष ८१ हजार रुपये ७) रामा ६१ यमाई मंदिर चिरेबंदी रस्ता करणे – ३.००० कि.मी रक्कम – ५ कोटी ४ लक्ष ३९ हजार रुपये ८) ग्रामा २०८ ते बेंद रस्ता करणे – ३.६०० कि.मी रक्कम – ५ कोटी ७१ लक्ष ६९ हजार रुपये. ९) प्रजिमा ४ उंब्रज – १ ते सोंडेवस्ती रस्ता करणे – ४.४५० कि.मी रक्कम – ७ कोटी २६ हजार २० हजार रुपये १०) डिंगोरे ते घोडेमळा आलमे रस्ता करणे – ४.१७५ कि.मी रक्कम – ७ कोटी ५० लक्ष १७ हजार रुपये ११) ग्रामा १४५ कुंटेमळा ते चांदाई वस्ती रस्ता करणे – २.७०० रक्कम – ४ कोटी ३३ लक्ष ४९ हजार रुपये.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे