वडज उपसा सिंचन योजनेसाठी शासनाची मान्यता; ३५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर:- आमदार अतुल बेनके
1 min readमुंबई दि.१८:- राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या निधीसाठी प्रयत्न चालू होते. यातील एका महत्वकांक्षी प्रकल्पाला आज गुरुवार दि .१८ रोजी शासनाने मान्यता दिली.
मीना खोऱ्यातील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी महत्वाची योजना वडज उपसा सिंचन या योजनेसाठी शासनाने ३५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करत या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याची माहिती तालुक्याचे आमदार अतुल बनके यांनी दिली.
या योजनेसाठी स्व. वल्लभ बेनके देखील आग्रही होते त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार आहे. स्व. बेनके साहेबांनी दाखवून दिलेल्या दिशेनुसार मार्गक्रमण करत असताना माझ्या कार्यकाळात चिल्हेवाडी पाईप लाईन योजना,
वडज उपसा सिंचन योजना यासारख्या दीर्घकालीन महत्वकांक्षी प्रकल्पांना मंजुरी मिळवून त्यासाठी निधी देखील उपलब्ध करण्यात यश आले याचे समाधान माझ्या मनामध्ये असल्याचं आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
या योजनेच्या माध्यमातून सावरगाव, वडज, खिलारवाडी, निमदरी, विठ्ठलवाडी, धोंडकरवाडी, काचळवाडी, पाबळवाडी, निळोबाराय नगर यांसह इतर वाड्या वस्त्यांना याचा लाभ होणार आहे.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मा. दिलीपराव वळसे पाटील यांचे आमदार बेनके यांनी आभार मानले.