खिरेश्वर येथे वनविभागाच्या वतीने पर्यावरण शुल्क नाक्याची उभारणी
1 min read
जुन्नर दि.१२:- वनसंपदेचे रक्षण, सुरक्षित पर्यटन व गावाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी वन विभागाचा निर्णय असून खिरेश्वर तसेच किल्ले हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेली विविध पर्यटन स्थळे अडराई, काळु धबधबा, प्राचीन नागेश्वर मंदिर, पिंपळगाव जोगा धरण क्षेत्र येथे पर्यटक, ट्रेकर्स, निसर्गा अभ्यासक ई. मोठ्या संखेने पावसाळ्यात फिरायला व ट्रेकिंग साठी येत असतात.
या कालावधीत सदर पर्यटन स्थळी अनुचित प्रकार घडू नये, वनसंपदा सुरक्षित रहावी तसेच सुरक्षित व जबाबदार पर्यटन होऊन खिरेश्वर गावचा पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास व्हावा या
उद्देशाने जुन्नर वनविभागाच्या वतीने दि.१२/०७/२०२४ रोजी खिरेश्वर येथे खुबी बंधारावर वनविभाग जुन्नर व संयुक्त वनव्यवस्थापन समिती खिरेश्वर यांच्या मार्फत पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला आहे.
अमोल सातपुते उपवनसंरक्षक, जुन्नर यांच्या संकल्पनेतून अमित भिसे, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांच्या उपस्थित हा पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला. याप्रसंगी देवराम मेमाने, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती खिरेश्वर,
विजय काठे, सरपंच खिरेश्वर, कुसुम कवठे उपसरपंच, अभिजित भोरले, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य वनविभागाचे वनपाल आर.डि.गवांदे, वनरक्षक कोमल डाखोरे, वनरक्षक आर.के.फुलवड तसेच वन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.