पिंपळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला वन विभागाकडून ५ लाखांची मदत

1 min read

पिंपळवंडी दि.११:- पिंपळवंडी (लेंडेवस्ती ता. जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुदैवाने बचावलेल्या अश्विनी मनोज हुलवळे यांना वन विभाग तर्फे ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपचार खर्चासाठी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. यातील ३ लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ करण्यात आली होती. तर बुधवार दि.१० रोजी २ लाख रुपये चा धनादेश देण्यात आला. अश्विनी हुलवळे यांच्यावर ५ मे २०२४ रोजी शेतात काम करत असताना शेजारील शेतात भक्षासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ वन विभागाचे कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. वन विभागाच्या दक्षतेमुळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे अश्विनी हुलवळे यांची प्रकृती सुधारली. व त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सदर घटनेचा मागोवा घेत उपवनसंरक्षण अधिकारी अमोल सातपुते, सहाय्यक वन संरक्षण अधिकारी अमित भिसे यांनी नुकसानग्रस्त महिलेला आर्थिक साहाय्य मिळून दिले. उपचारासाठी एकूण ५ लाख रुपयांच्या धनादेश वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे. आळे वनपाल संतोष साळुंखे यांच्या हस्ते ग्रामस्थांनी च्या समक्ष हुलवळे यांना धनादेश देण्यात आला.याप्रसंगी पिंपळवंडी गावच्या सरपंच मेघा काकडे, उपसरपंच मयूर पवार,संदीप लेंडे,संगीता वाघ,टी आर वामन,गणेश वाघ, उत्तम लेंडे,अजित वाघ,रघुनाथ लेंडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे