नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ३ जागीच ठार तर ८ ते १० गंभीर जखमी; ग्रामस्थ आक्रमक

1 min read

बेल्हे दि.१९:- गुळंचवाडी (ता. जुन्नर) शिवारात भीषण अपघात झाला आहे. नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ८ ते १० गंभीर जखमी झाले आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावर घडली.

यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात मृत्यू व जखमींची सख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असल्याने. संतापलेल्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे. महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर बसले आहे. दोन तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून रस्ता केल्याने वारंवार अपघात होवून त्यात ग्रामस्थांचे बळी जात आहेत. त्यामुळे त्याला महामार्ग प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका मांडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे