आणे, गुळुंचवाडी गावावर शोककळा; अपघातात ४ ठार तर ८ ते १० गंभीर जखमी; जखमी व मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदतीची मागणी

1 min read

बेल्हे दि.१९:- गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून ८ ते १० गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवार दि.१९ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्याण- नगर महामार्गावर घडली.

या अपघातातील मृतांमध्ये आई व लहान मुलाचा समावेश असून चौघांचा मृत्यू झाला आहे. शितल योगेश दाते (वय ३०) व मुलगा रियांश योगेश दाते (वय ५ वर्ष) राहणार आणे, तालुका जुन्नर जिल्हा पुणे) तसेच दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय ६२, राहणार गुळंचवाडी, तालुका जुन्नर) हे तिघे जागीच ठार झाले.

तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय ८० राहणार, गुळंचवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) हे उपचार दरम्यान मयत झाले. या अपघातात ८ ते १० जन जखमी झाले असून यामधे सुधीर काशिनाथ गुंजाळ, अमोल नाथा गुंजाळ, ज्ञानदेव नामदेव कर्डिले, विठ्ठल हरिभाऊ जाधव, योगेश नारायण दाते.

धोंडीबा सदाशिव पिंगट, जानकाबाई भांबेरे हे गंभीर जखमी झाले आहेत काही जखमींचा नावे समजू शकली नाहीत. नगर वरून आळेफाटाच्या दिशेने येताना गुळुंचवाडी गावाजवळ उतार असल्याने ही ट्रक भरधाव वेगाने आली. यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या ७ ते ८ चार चाकी व दुचाकी वाहनांना धडक दिली.

तसेच मयताचा विधी आटपून आलेल्या लोकांना ही चिरडले. वाहनांचे ही मोठे नुकसान झाले आहे. ट्रक क्रमांक एम एच १० ए डब्ल्यू ३२९७ वरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलिस अनिल पवार यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. तसेच जखमी व मृत नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी तालुक्यातील नेत्यांनी केली आहे. चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आळेफाटा पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण महामार्गावर ४ ते ५ तास रास्ता रोको आंदोलन केले. अपघाताला महामार्ग प्रशासन जबाबदार आहे.

बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून रस्ता केल्याने वारंवार अपघात होवून त्यात ग्रामस्थांचे बळी जात आहेत. त्यामुळे प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नागरिकांनी केली महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे